
महाराष्ट्रात दुष्काळ स्थिती ऑक्टोबरमध्ये ठरणार
बातमी थोडक्यात
दुष्काळात तातडीने कार्यवाही करा, अशी विरोधकांची मागणी असताना दुष्काळ निर्णय ऑक्टोबरमध्ये जाहीर करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. दुष्काळग्रस्त गावात पाणी टंचाई जाणवल्यास स्थानिक प्राधिकरणांकडून टँकर सुरू करता येतील. रब्बी हंगामातील दुष्काळ जाहीर करण्याचा अंतिम निर्णय ३१ मार्चला होणार आहे.