
बीड चारा टंचाईमुळे ८.५५ लाख जनावरांना धोका
बातमी थोडक्यात
बीड जिल्ह्यातील चारासाठा ८.५५ लाख जनावरांना १०० दिवस पुरेल इतका नाही, काही तालुक्यांमध्ये तर २१ ते ७६ दिवसांचा तुटवडा भासू शकतो. अपुऱ्या पावसामुळे पिकांचे उत्पादन विस्कळीत झाले असून ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. सोयाबीन, कापूस, तूर या प्रमुख पिकांचे वाळणे सुरू झाले असून सिंचन प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठ्याच्या १६.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.