
मराठी शेतकरी उडतो फ्रेंच आकाशात
बातमी थोडक्यात
पुण्यातील पॅराग्लायडिंग पायलट मंगेश दिघे यांनी फ्रान्समध्ये पार पडलेल्या कूप कार २०२६ या फ्लाइंग फेस्टिव्हलमध्ये पारंपरिक मराठी पोशाख परिधान करून सहभाग घेतला. सेंट हिलरी पर्वतावर पार पडलेल्या या महोत्सवाच्या ५३ व्या पर्वात दिघे यांनी उड्डाण करत मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले. या कार्यक्रमात विविध हवाई प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दिघे यांनी धोतर, जब्बा आणि फेटा परिधान करून सुरक्षिततेशी तडजोड केली नाही.