
देवगड बीच स्वच्छता अभियान सुरू
बातमी थोडक्यात
'स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ५.०' या अभियानाची सुरुवात १२ सप्टेंबर २०२६ रोजी देवगड बीच येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते झाली. देवगड तालुक्यातील १२ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी, स्थानिक नागरिक यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. समुद्रकिनारे अधिक सुंदर, सुरक्षित आणि पर्यटक-स्नेही बनवण्याच्या उद्देशाने डॉ. अपूर्वा बसूर यांनी सामुदायिक सहभागावर भर दिला.