
पळसखेड्यात ८० वर्षीय महिलेला लुटले
बातमी थोडक्यात
पळसखेड्यात द्वारकाबाई साहेबराव कुचेकर यांच्या गळ्यात ५० हजार रुपयांचा सोन्याचा हार तीन चोरट्यांनी लुटला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा मुलगा भरत कुचेकर याच्यावर वार करण्यात आले. उपचारार्थ तो सांगलीत आहे. या घटनेमुळे कुचेकर वस्ती परिसरात जनजीवन विस्कळीत झाले.