
मुंबईत गणेश मंडपाजवळ दोघांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
काळचौकी येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने तात्पुरत्या पेय पदार्थांच्या स्टॉलजवळ विजेचा धक्का लागून ३३ वर्षीय महिलेचा आणि आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पहाटे २.१५ च्या सुमारास ही घटना घडली असून यात १२ वर्षीय मुलीसह चार जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. काळचौकी पोलिसांनी स्टॉल मालक कमल शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.