
अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर कारची रॅम्पिंग
बातमी थोडक्यात
अमरावती रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून एक खासगी स्कॉर्पिओ कार शनिवारी फलाटावर आली. त्यावेळी अमरावती-मुंबई अंबा एक्सप्रेस फलाटावर उभी होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अतिवेगाने गाडी रेल्वेच्या जवळ आल्याने सुरक्षा यंत्रणेकडून झालेल्या चुकीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे स्टेशनवर प्रवेश नियंत्रण आणि सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.