
माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा फेसबुक पोस्टद्वारे भाजपा प्रवेश
बातमी थोडक्यात
चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाजपा प्रवेश जाहीर केला. त्यांच्या पक्षांतरामुळे चिखलीत नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. 2024 मध्ये भाजपाच्या श्वेता महाले यांच्याकडून पराभूत झालेल्या बोंद्रे यांनी मुकुल वासनिक यांचे मार्गदर्शन आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळे यांच्याशी असलेले बंधुभाव असल्याचे सांगितले.