
वाशी : पावसासाठी नमाज-ए-इस्तिस्का
बातमी थोडक्यात
दीर्घकाळ दुष्काळामुळे खरीप पिकांवर संकट आले असताना शुक्रवारी १८ सप्टेंबर २०२६ रोजी वाशी येथील ईदगाह मैदानावर पावसासाठी नमाज-ए-इस्तिस्का घेण्यात आली. खरीप हंगामात पावसाने साथ न दिल्याने पिके मरणासन्न झाली असून त्याचा परिणाम शेती उत्पादनावर गंभीरपणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील शेतकरी आता अधिकच बिकट परिस्थितीला तोंड देत आहेत. पावसाअभावी शेतीतील उत्पन्न बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.