
खेळाडूंना निवासी क्रीडा अकादमीत शिक्षण व करिअरचा समतोल साधण्याचे आवाहन
बातमी थोडक्यात
क्रीडा उपसंचालक शेखर पाटील व डॉ. मिलिंद दुसाने यांनी गणेशोत्सवाच्या 'लोक संवाद' कार्यक्रमात खेळाडूंना क्रीडा कौशल्याबरोबरच शिक्षण व करिअरची तयारी करण्याचा सल्ला दिला. खेळाडूंना त्यांच्या अनुभवानुसार प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, शरीरविज्ञान, पुनर्वसन या क्षेत्रातील करिअरचा विचार करण्यास सांगितले. तसेच ११वी व १२वी नंतरची आवड व संधी यानुसार करिअरची दिशा ठरवावी, असे आवाहन केले.