
शेंद्रा-वाळूज उड्डाणपूल डीपीआर अंतिम
बातमी थोडक्यात
जालना रोडचा महत्त्वाचा भाग असलेल्या शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपूल प्रकल्पाचा अंतिम डीपीआर टप्प्यात प्रवेश झाला आहे. शेंद्रा ते पंढरपूरपर्यंत हा उड्डाणपूल ४ हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणार असून तीन महिन्यांत निविदा काढण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या प्रकल्पाद्वारे छत्रपती संभाजीनगरमधील वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिक व उद्योगांची कनेक्टिव्हिटी सुधारेल.