
भारतीय हवाई दलाचे निवृत्त पायलट आल्फ्रेड टायरोन कुक यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन
बातमी थोडक्यात
भारतीय हवाई दलाचे निवृत्त फ्लाईट लेफ्टनंट आल्फ्रेड टायरोन कुक यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले. भारतीय हवाई दलातील हे वीर १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शूरवीर होते. १९६५ च्या युद्धात त्यांनी एकट्यानेच कलईकुंडा येथे झालेल्या हवाई लढाईत पाकिस्तानच्या चार लढाऊ विमानांना रोखले होते. त्यांच्या या पराक्रमामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाने पूर्व भारतावर केलेल्या हल्ल्याला त्यांनी हाणून पाडले होते. त्यांना या शौर्यासाठी वीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.