दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळील सांडपाणी प्रश्न सोडवणार सीएम प्रमोद सावंत
बातमी थोडक्यात
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळील सांडपाणी प्रश्न लवकरच सोडवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रहिवाशांना व कार्यकर्त्यांना दिली. साळ नदीजवळ सांडपाणी गटारात मिसळल्याने प्रदूषण व सार्वजनिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून या स्रोताला कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे. गटारात सांडपाणी जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज सावंत यांनी अधोरेखित केली.