
शेनवडीत आगीत पत्नी, मुलगा, मुलीचा बळी
बातमी थोडक्यात
ता. माण, जि. सातारा येथील शेनवडीत १० सप्टेंबर २०१३ रोजी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून बाळासाहेब काटकर यांच्या पत्नी, मुलगा व मुलीचा मृत्यू झाला. सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महावितरणला १२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईमध्ये व्याज व अतिरिक्त शुल्क देण्याचे आदेश दिले. शेनवडीत भाड्याच्या घरात हे कुटुंब राहत होते.