
छत्रपती संभाजीनगरला मिळणार ४ हजार कोटींचा अखंड उड्डाणपूल
बातमी थोडक्यात
शेंद्रा येथून सुरू होऊन केंब्रिज मार्गे जाऊन बाजाजनगरमधील ओएसिस चौकापलीकडे संपणारा नवा अखंड उड्डाणपूल नियोजित आहे. ४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल घडणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांत निविदा काढली जाण्याची शक्यता आहे.