
भूमकर पुलावर कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू, चार जखमी
बातमी थोडक्यात
मुंबई-बंगळुरू महामार्गावर कंटेनर चालकाचे वेगात असलेल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पाच गाड्यांना धडक बसली. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.