
राज्याच्या सर्वात लांब उड्डाणपुलाचे आज उद्घाटन
बातमी थोडक्यात
उत्तर व दक्षिण नागपूरला जोडणारा राज्यातील सर्वात लांब ८.९ किलोमीटरचा उड्डाणपूल आज उद्घाटनाला जाणार आहे. नागपूरकरांना या दोन भागांमध्ये थेट वाहतूक कोंडीशिवाय ये-जा करता येणार आहे. ९९८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या घरापासून जवळून जाणार आहे.