
माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अधिकारी
बातमी थोडक्यात
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका विवाहित महिलेने केला असून, पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराच्या आरोपांमुळे कल्याणचे राजकारण तापले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्याची मागणी सार्वजनिक आणि राजकीय वर्तुळातून होत आहे. पडघा पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.