
जयगड बंदरात जहाजाच्या अपघातात इजिप्शियनचा मृत्यू
बातमी थोडक्यात
अरबी समुद्रात १० एप्रिल रोजी 'एमव्ही रेक एलिट' या जहाजाच्या अपघातात इस्लाम आदेल अहमद अब्देल लतीफ या ३५ वर्षीय इजिप्शियन नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबईच्या यलो गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने कागदपत्रे रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. जयगड सागरी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.