
कोपरगावमध्ये सणासुदीच्या काळात एफडीएकडून ३.६० लाख रुपयांचा गूळ आणि तूप जप्त
बातमी थोडक्यात
सणासुदीच्या काळात कोपरगाव तालुक्यात एफडीएने 'फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६' राबवून २१४९ किलो गूळ आणि ३४९ किलो तूप जप्त केले असून त्याची किंमत ३.६० लाख रुपये आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे उल्लंघन आढळून आले. जप्त केलेल्या वस्तूंचे विश्लेषण करून पुढील कार्यवाही केली जाईल.