
अमित शहा यांच्या हस्ते एकंबा येथील बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन
बातमी थोडक्यात
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते एकंबा येथील बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. (मल्टीस्टेट) या नवीन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील नेते, देवेंद्र फडणवीस, डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी भव्य मंडप व डिजिटल स्क्रीन उभारण्यात आले आहेत.