
ईएसआयसी रुग्णालयाजवळ सिमेंट मिक्सरने चिरडून तरुणाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
दरगवाली मशिदीतून नमाज पढून घरी परतत असताना सिमेंट मिक्सरच्या धडकेत एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. १८ सप्टेंबर रोजी ईएसआयसी रुग्णालयाजवळ ही घटना घडली. यापूर्वी या तरुणाने दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली होती. १६ सप्टेंबर रोजी बहिणीला सोडताना झालेल्या अपघातात त्याचा भाऊही गंभीर जखमी झाला होता.