
पिशोरच्या सकल सुतार समाजाच्या वतीने कलश यात्रा भव्य मिरवणूक व महाप्रसाद
बातमी थोडक्यात
पिशोरच्या सकल सुतार समाजाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा प्रकाश दिन साजरा करण्यासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलश यात्रा मध्ये शेकडो महिला पारंपरिक वेशभूषा करून कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. विश्वकर्मा मंदिरात धार्मिक विधी व महाप्रसाद वाटण्यात आला व संपूर्ण शहर भावनेने भारले होते.