
खुलताबाद मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा
बातमी थोडक्यात
खुलताबाद शहर व तालुक्यात जायंट्स ग्रुपच्या वतीने ध्वजारोहण सोहळा आयोजित करून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त लेखापाल गोरखनाथ बरगल यांनी भूषविले. या कार्यक्रमाला स्थानिक नेते व नागरिक उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम मराठी माध्यमिक शाळा व यशोदीप विद्यामंदिर येथे एकाच दिवशी आयोजित करण्यात आला होता.