
कर्जबाजारीपणामुळे खडगाव येथे शेतकऱ्याने गळफास
बातमी थोडक्यात
दुष्काळ, खराब पीक, नांगरणी खर्च आणि कर्ज फेडण्याच्या तणावामुळे पैठण तालुक्यातील खडगाव येथे शेतकरी सिकंदर हाशिम शेख याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अपघाती मृत्यू म्हणून तपास सुरू केला आहे.