
अमित शहा आज हुबळी आणि एकंबाला भेट देणार
बातमी थोडक्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी हुबळी आणि एकंबाला भेट देणार आहेत. ते सकाळी ११ वाजता हुबळी येथील जेजीएमएमएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते करणार आहेत. हुबळी विमानतळावरून दुपारी १.५५ वाजता कोल्हापूरला रवाना झाल्यानंतर ते दुपारी २.३० वाजता छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर येथे उतरून दुपारी २.५० वाजता हेलिकॉप्टरने एकंबा येथे पोचून बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.