
शिवाजीनगरमध्ये पीएमपी बसला आग
बातमी थोडक्यात
पुणे स्टेशनवरून निगडीकडे निघालेल्या पीएमपी बसला शुक्रवारी सकाळी शिवाजीनगरमध्ये आग लागली. अग्निशमन दलाचे अधिकारी सुरेश पवार यांनी धूर बघितला आणि मुख्य नियंत्रण कक्षाला सूचना दिली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.