
७३ वर्षीय ड्रायव्हरने अर्धा किलोमीटर फरफटत नेली दुचाकी, अटक
बातमी थोडक्यात
दिल्लीतील आर. के. पुरम मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या दुचाकीला ७३ वर्षीय कार चालक वेणू गोपालने धडक दिली आणि अर्धा किलोमीटर फरफटत नेली. नागरिकांनी आरोपी चालकाला पकडले, गाडीतून बाहेर काढले आणि माफी मागण्यास भाग पाडले, या दरम्यान एका महिलेने त्याला थप्पड मारली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवून त्याला अटक केली.