
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन शाळांनी साजरा केला
बातमी थोडक्यात
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन छत्रपती संभाजीनगर येथील मुकुल मंदिर शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद कमांडर अनिल सावे यांनी भूषवले. शहीद जवानांप्रती विद्यार्थ्यांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली. तर गरखेडा येथील ज्ञानप्रकाश विद्यामंदिरात एस. पी. जावळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूजेने हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सहसचिव दिलीप यार्डी, प्राचार्य जयंत चौधरी, सुरेश परदेशी उपस्थित होते. ध्वजारोहण, भाषणे, गणपतीपूजन आदी कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला.