
श्री शिवाजी शिक्षण संस्थांच्या शिक्षणतज्ज्ञांना व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार
बातमी थोडक्यात
श्री शिवाजी शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार देण्यात आले. डॉ. अंबादास कुलत यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार, तर डॉ. पंकज नागपुरे यांना कै. बी. एस. उर्फ डॅडी देशमुख उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात झाला. हर्षवर्धन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.