
राहुड घाटातील मृत्यूमुळे उड्डाणपुलाची मागणी
बातमी थोडक्यात
पाच वर्षांत २. ५५ किमी लांबीच्या राहुड घाटात झालेल्या अपघातात २० हून अधिक निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे सहा पदरी उड्डाणपुलाची मागणी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केली आहे. घाटात अपघात झाल्यास पाच जिल्ह्यांमध्ये वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. तांत्रिक तपासणीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल.