
सोलापुरातील शिक्षकांची ३५ लाखांची फसवणूक
बातमी थोडक्यात
सोलापुरातील शिक्षकांना शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरपूर फायदा होईल असे सांगून राजू रामचंद्र बुटले याने ३५ लाख आणि २७ हजार रुपयांची फसवणूक केली. विजापूर रोड येथील पद्मश्री रामसिंह भानवट हायस्कूलमध्ये ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बुटले याच्या विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.