
सांगावडेवाडीत मोबाईलवरून झालेल्या वादातून कामगाराची हत्या
बातमी थोडक्यात
मोबाईलवरून झालेल्या शाब्दिक भांडणानंतर लोखंडी अँगलने डोक्यावर मारून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराची हत्या केली. कागल पंचतारांकित एमआयडीसी संकुलातील सांगावडेवाडी परिसरात एका गोदामात ही घटना घडली. सुहास दुधाडे याला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्कर्ष भोसले हा नट अँड बोल्ट दुरुस्ती कंपनीत काम करत होता, तर दुधाडे हा भंगार विक्रेत्याकडे काम करत होता.