
पुणे-बीड थेट रेल्वे आज सुरू
बातमी थोडक्यात
पुणे-बीड थेट रेल्वे सेवा आजपासून सुरू होत असून सात तासांचा प्रवास दररोज उपलब्ध होणार आहे. १६ डब्यांच्या या रेल्वेतून दोन हजार प्रवाशांची ने-आण होऊ शकणार असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे. बीड व परिसरातील नागरिकांना थेट रेल्वेने पुण्याला ये-जा करता येणार आहे.