
२०२६-२०२७ साठी संभाव्य परीक्षा वेळापत्रक NTA ने जाहीर केले.
बातमी थोडक्यात
NTA ने डिसेंबर 2026 ते मार्च 2027 पर्यंत राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जारी केले आहे. डिसेंबर 2026 मध्ये RIMC, SWAYAM, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, UGC NET आणि संयुक्त CSIR UGC NET या पाच परीक्षा होणार आहेत. जानेवारी 2027 मध्ये आर्मी कॅडेट कॉलेज, श्रेष्ठ (NETS), NIFT प्रवेश परीक्षा, JEE मुख्य सत्र 1 आणि अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा या पाच मोठ्या परीक्षा होणार आहेत.