
वासुंबेत दुचाकीच्या धडकेत बाप-लेकीचा बळी
बातमी थोडक्यात
वासुंबे येथील ब्रम्हनाथ मंदिराच्या जवळ उभ्या असलेल्या पिकअप ट्रकवर दुचाकीने धडक दिल्याने सागर बाबुराव जाधव व त्यांची मुलगी हर्षिता सागर जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. आई सोनालीला डोक्याला मार लागल्याने मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे तासगाव तालुक्यात सर्वत्र दुःखाचे वातावरण आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल.