
४० दिवस पावसाने साथ न दिल्याने करमाळा तालुक्यात दुष्काळ संकट
बातमी थोडक्यात
४० दिवस पावसाने साथ न दिल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ संकटाचा सामना करावा लागत असून पिके खुंटली असून उडीद जळून खाक झाली आहे. सिना नदी कोरडी असून पाणीसाठा संपला असून पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचे स्रोतही संपले आहेत. अण्णासाहेब सुपनवार यांनी दुष्काळ जाहीर करून पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.