
एमआयटी कॉलेजमध्ये ५२७ विद्यार्थ्यांसह राष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन
बातमी थोडक्यात
आळंदी येथील एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कुरुक्षेत्र २.० – हॅकफेस्ट या राष्ट्रीय हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाच राज्यांतील ७६ महाविद्यालयांतील ५२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. मोजिला एमआयटीएएससी क्लबने महाविद्यालयाच्या आयआयसी अंतर्गत या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या संघांना एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.