
कर्जमाफी दुसरी यादी जाहीर; जिल्ह्यात १ हजार ४४२ शेतकरी पात्र
बातमी थोडक्यात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६५७ तर राष्ट्रीयीकृत बँकांचे ७८५ असे एकूण १ हजार ४४२ शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे, तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी जवळच्या आपाळे सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी.