
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी
बातमी थोडक्यात
१२ सप्टेंबर रोजी दक्षिण छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून मुंबईत पुढील २४ तास वातावरण ढगाळ राहील. उपनगरात अतिवृष्टीसह ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.