
आज जरींगे पाटील श्रीगोंदा मार्केट चौकातच राहणार
बातमी थोडक्यात
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज श्रीगोंदा तालुक्यात मुक्काम करणार आहेत. आज त्यांच्या भेटीसाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सुरक्षेसाठी ४०० पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.