
मराठा आंदोलनामुळे नाशिक-कळवण रस्त्यावरील वाहतूक ठप्प
बातमी थोडक्यात
आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिंडोरी तालुक्यात मराठा समाजाने १ तास धरणे आंदोलन केले. नाशिक-कळवण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांब रांगा लागल्या होत्या. सकल मराठा समाजाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणीचे निवेदन दिले.