
राहाता बाजार समितीमध्ये कांदा ५८०० रुपये क्विंटल दराने दाखल
बातमी थोडक्यात
राहाता बाजार समितीमध्ये मंगळवारी कांदा दाखल झाला असून, कांद्याचा कमाल भाव ५८०० रुपये क्विंटल झाला आहे. बाजार समितीमध्ये ४६८४ पोती कांदा दाखल झाला असून, कांदा क्र. १ चा भाव ४५०० ते ५८०० रुपये, तर कांदा क्र. २ चा भाव २९०० ते ४४५० रुपये दरम्यान आहे. कांदा दाखल झाला त्याच दिवशी भाव निश्चित करण्यात आला आहे.