
ट्रक मास्टरचा कोल्हापूर अपघातात मृत्यू
बातमी थोडक्यात
खाराडे कॉलेजजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रक बॉडी बनवणारे प्रसिद्ध मास्टर बाबूराव लोहार यांचा मृत्यू झाला. अंबाबाई मंदिर व बाबुजामल दर्ग्याला जाऊन परतत असताना त्यांच्या चारचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.