
सिंधुदुर्गात बुवा समीर कदम यांचे निधन
बातमी थोडक्यात
पोखरण गावचे प्रसिद्ध डब्बलबारी भजन गायक बुवा समीर रामा कदम यांचे सिंधुदुर्ग शहर जिल्हा रुग्णालयात निधन झाले. टी-2, डब्बलबारी, तिरंगी भजन गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गायकाचे अचानक निधन झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर किरकोळ आजाराचा उपचार सुरू होता.