
अमृत योजनेचा लाभ अकोल्यातील २६. ५७ लाख ज्येष्ठ नागरिकांना
बातमी थोडक्यात
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या अमृत मोफत प्रवास योजनेचा लाभ अकोल्यातील २६ लाख ५७ हजार ज्येष्ठ नागरिकांना झाला आहे. यासाठी १९ कोटी ६ लाख ५९ हजार रुपयांच्या अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बसेस आता पूर्ण क्षमतेने भरत असून शासनाच्या परताव्यामुळे तिचे उत्पन्न वाढत आहे.