
तांभुर्णी बाजार सणासुदीच्या काळात तेजीत
बातमी थोडक्यात
एकाच आठवड्यात येणाऱ्या गणेश व महालक्ष्मी उत्सवाच्या काळात तांभुर्णीच्या आठवडी बाजारात ग्राहकांची गर्दी झाली होती. तांभुर्णी, पापल, आंबेगाव, कुंभारझरी, अकोला, देव व आसपासच्या गावातील नागरिक खरेदीसाठी जमले होते. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, महिलांसाठी विशेष दुकाने यामुळे सकाळपासूनच खरेदीला उधाण आले होते.