
भातसा तलाव भरला, टळले मुंबईतील पाणीसंकट
बातमी थोडक्यात
ठाणे जिल्ह्यातील भातसा तलाव समाधानकारक पावसामुळे पूर्ण क्षमतेवर पोहोचला असून मुंबईतील निम्म्या रहिवाशांना दररोज १८५० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी पुरवठा होत आहे. सर्व तलावांमध्ये ९८ टक्के पाणी साठल्याने लवकरच शहरातील पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल.