
डिजिटल रीलच्या माध्यमातून पेशवेकालीन गणेशोत्सव दाखवणार युवक
बातमी थोडक्यात
राजराजेश्वर नगर येथील पेशवेकालीन श्रीबाराभाई गणपती गणेश उत्सवात यंदा डिजिटल रील स्पर्धा होणार असून युवक व भाविक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दाखवणार आहेत. श्रीबाराभाई गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक संदेश, पर्यावरण संवर्धन व ऐतिहासिक परंपरांचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. १४ ते २० सप्टेंबर दरम्यान रील सादर कराव्यात. भक्ती, संस्कृती व सर्जनशीलता यातून रील सादर कराव्यात.