
गीतानगर सखी मंडळातर्फे कृष्णा जन्माष्टमी साजरी
बातमी थोडक्यात
अकोला गीतानगर सखी मंडळातर्फे श्री रामदेवबाबा-श्यामबाबा मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांच्या माध्यमातून कृष्णा जन्माष्टमी साजरी करण्यात आली. नंदबाबा व यशोदा माईयांच्या भूमिकेत चंदना लाटुरिया व नेहा साहू यांनी भूमिका साकारली तर बालकृष्णच्या भूमिकेत कियारा गुप्ताचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रीती सराफ व शीतल गांधी यांनी आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा व खेळांमध्ये मुलांनी सहभाग घेतला.